बेकायदेशीर लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान : बाळ माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:08+5:302021-04-09T04:33:08+5:30

रत्नागिरी तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष निखिल देसाई यांचे बाळ माने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गणेश भिंगार्डे, अमाेल ...

Loss of traders due to illegal lockdown: Bal Mane | बेकायदेशीर लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान : बाळ माने

बेकायदेशीर लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान : बाळ माने

Next

रत्नागिरी तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष निखिल देसाई यांचे बाळ माने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गणेश भिंगार्डे, अमाेल डाेंगरे, अमेय वीरकर उपस्थित हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : बेकायदेशीरपणे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. सामान्य व्यापारी भिकेकंगाल होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची ही समस्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याकडे नक्की मांडू, अशी ग्वाही भाजपचे माजी आमदार तथा रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिली.

रत्नागिरी व्यापारी महासंघाचे नूतन तालुकाध्यक्ष निखिल देसाई, शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे, अमोल डोंगरे, अमेय वीरकर यांनी गुरूवारी माजी आमदार माने यांची मारुती मंदिर येथील तालुका खरेदी - विक्री संघाच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी व्यापारी महासंघातर्फे या लॉकडाऊनमुळे कशा प्रकारे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, याची माहिती देण्यात आली.

वाढत्या कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात दर शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु आता सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्येही बेकायदेशीर पद्धतीने, फसवणुकीने लॉकडाऊन लावला आहे. यामुळे रत्नागिरी बाजारपेठेची अर्थव्यवस्था बिघडली आहे. गेल्या वर्षी सुमारे पाच महिन्यानंतर बाजारपेठ सुरू झाली होती. पण, पाच महिने दुकानातील कामगार, पार्सल गाड्यांमध्ये अडकलेला माल, तसेच अनेक दुकाने कायमची बंद करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे, असे सांगण्यात आले.

नोव्हेंबरपासून दुकाने सुरळीत सुरू झाली होती. हळूहळू जनजीवन सुरळीत होऊ लागले. पण, आता पुन्हा लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था डबघाईस जाणार आहे. मागील वेळेस काही जणांना नुकसान भरपाई मिळाली होती. ती भरपाई पुन्हा मिळणार का? मागील लॉकडाऊनच्या काळामध्ये बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ दिली होती. या वेळीही तशीच मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

३० एप्रिलपर्यंत दर शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याला देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. पण सोमवार ते शुक्रवारच्या लॉकडाऊनला विरोध करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात फडणवीस व आमदार दरेकर यांची भेट घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळावी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करू, अशी ग्वाही बाळ माने यांनी दिली.

Web Title: Loss of traders due to illegal lockdown: Bal Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.