समाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 05:13 PM2020-02-27T17:13:29+5:302020-02-27T17:14:17+5:30

मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

Marathi is a hotbed of social media | समाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळी

समाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळी

Next
ठळक मुद्देसमाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळीबोललेले लिहिले जाते

मनोज मुळ्ये 

रत्नागिरी : मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

गेल्या पाच-सात वर्षात विविध दूरसंचार कंपन्यांनी भाषेच्या या वापराचे प्रमाण लक्षात घेऊन संदेश पाठवण्यासाठीही मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आजच्या घडीला मराठीतून संदेश पाठवण्यासाठीच्या असंख्य प्रणाली भ्रमणध्वनीवर उपलब्ध आहेत.

अलिकडच्या काळात सर्वाधिक वापर होत असलेली गोष्ट म्हणजे भ्रमणध्वनी. बोलण्यापेक्षा त्याचा वापर संदेशवहनासाठी अधिक होत आहे. भ्रमणध्वनीचा वापर सुरू झाला, तेव्हापासूनच संदेशवहनाला अधिक महत्त्व आले. त्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी विविध योजना आणल्या. फक्त संदेश (एमएमएस) पाठवण्यासाठीच्या आकर्षक योजनांनी संदेशवहनाचे महत्त्व वाढले. नंतर व्हॉट्सअ‍ॅप दाखल झाल्यानंतर त्या माध्यमातून संदेश पाठवले जाऊ लागले.

सुरूवातीला इंग्रजी शब्द देवनागरी अर्थाने वापरले जाऊ लागले. पण संदेश वहनासाठी मातृभाषा उपलब्ध झाली तर त्याचा पर्यायाने इंटरनेटचा वापर अधिक वाढेल, याचा अंदाज आल्याने दूरसंचार कंपन्यांनी संदेशवहनासाठी इंग्रजीसोबत मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिले.

या पर्यायाचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर झाला की, अनेक कंपन्यांनी, इतकेच नाही तर प्रणाली (अ‍ॅप्लिकेशन) तयार करणाऱ्यांनीही अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळेच आजच्या घडीला अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीमध्ये ३0पेक्षा अधिक मराठी टंकलेखनाच्या प्रणाली उपलब्ध आहेत. ह्यगुगल प्लेस्टोअरह्णवर मराठी कीबोर्ड (कळफलक) शोधताना असंख्य पर्याय येतात. त्याचा जितका वापर वाढत आहे, तितका आधुनिकपणा त्यात आणला जात आहे. अनेक जोडशब्दांची उपलब्धता होत आहे.

आता त्यात इतका आधुनिकपणा आला आहे की, बोललेले शब्द आपोआप टंकलिखित करणाऱ्याही अनेक मराठी प्रणाली आहेत. या पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने आता संदेशवहनासाठी मराठीचा अधिकाधिक वापर होत असल्याचेही पाहायला मिळते. मराठीचा वापर वाढल्यामुळे त्यात सुधारणाही तेवढ्याच होत आहेत.

बोललेले लिहिले जाते

संदेशवहनात मराठीचा वापर वाढल्यामुळे आता त्यात प्रयोगही खूप होत आहेत. भ्रमणध्वनीवर बोटाने लिहिलेली अक्षरे टंकलिखित नमुन्यात तयार करण्याची प्रणालीही आता उपलब्ध झाली आहे. त्यासाठी टंकलेखन करावे लागत नाही. बोललेले शब्द उमटत जातात आणि संदेश तयार होतो.

Web Title: Marathi is a hotbed of social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.