कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची शुक्रवारी रत्नागिरीमध्ये बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:46 PM2017-10-18T16:46:59+5:302017-10-18T16:53:10+5:30
कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना प्राधान्य देत नसल्याने त्या निषेधार्थ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील रेल्वे प्रकल्पग्रस्तांची एक बैठक शुक्रवारी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या तीनही जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.
रत्नागिरी , दि. १८ : कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना प्राधान्य देत नसल्याने त्या निषेधार्थ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील रेल्वे प्रकल्पग्रस्तांची एक बैठक शुक्रवारी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या तीनही जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र संजय गुप्ता यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करण्याचा विचार प्रकल्पग्रस्त करत आहेत.
त्यासाठीच शुक्रवार २0 रोजी रत्नागिरीतील शासकीय रूग्णालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११.३0 वाजता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रागयड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
कोकण रेल्वेच्या सर्व प्रकल्पग्रस्तांनी ह्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहून कोकण रेल्वे प्रशासन व केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणांच्याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीकडून करण्यात येत आहे.