रत्नागिरी : स्वतःवर लॉकडाऊनचे संकट असतानाही निसर्ग चक्रीवादळात बाधित कुटुंबियांना लाखो रुपयांची मदत करणाऱ्या रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी आपले दातृत्व दाखवले. शहरातील धनजी नाका येथील व्यापारी दिलावर शेमना यांना आर्थिक मदतीचा हात दिल्याने अंधारात अडकलेले दिलावर शेमना यांचे दुकान पुन्हा प्रकाशमान झाले आहे.शहरातील धनजी नाका येथे दिलावर शेमना यांचे फोटो फ्रेम तयार करण्याचे छोटेसे दुकान आहे. लॉकडाऊनच्या संकटात त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. वीजबिल थकल्याने काही महिन्यांपूर्वी महावितरणने वीजप्रवाह खंडित केला. पाणी बिल, मुलांची शाळेची फी सर्वच थकले. अखेरीस मोठ्या आशेने शेमना यांनी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांकडे धाव घेतली.या व्यापाऱ्यांनी चक्रीवादळात बाधित झालेल्या कुटुंबियांसाठी शहरातील व्यापाऱ्यांकडून मदत गोळा केली होती. त्यापैकी काही शिल्लक असणाऱ्या रकमेतून शेमना यांचे वीजबिल भरण्यात आले. त्यानंतर महावितरणने त्यांचा वीजपुरवठा सुरू करून दिला.यावेळी राजकुमार जैन, गणेश भिंगार्डे, नीलेश शामकांत मलुष्टे, हेमंत वणजू, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन, मकरंद खातू, सौरभ मलुष्टे, योगेश मलुष्टे, संदेश गांगण, मुकुल मलुष्टे, सचिन केसरकर, कौस्तुभ दीक्षित, अमेय वीरकर हे व्यापारी उपस्थित होते. या मदतीमध्ये रत्नागिरी शहरातील प्रत्येक व्यापाऱ्याने योगदान दिले असल्याने या युवा व्यापाऱ्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत. त्यांच्यामुळे एक कुटुंबच प्रकाशमान झाले आहे.
Coronavirus Unlock -व्यापाऱ्याच्या पाठीशी उभे राहिले रत्नागिरीतील व्यापारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:31 PM
Coronavirus Unlock Ratnagiri- स्वतःवर लॉकडाऊनचे संकट असतानाही निसर्ग चक्रीवादळात बाधित कुटुंबियांना लाखो रुपयांची मदत करणाऱ्या रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी आपले दातृत्व दाखवले. शहरातील धनजी नाका येथील व्यापारी दिलावर शेमना यांना आर्थिक मदतीचा हात दिल्याने अंधारात अडकलेले दिलावर शेमना यांचे दुकान पुन्हा प्रकाशमान झाले आहे.
ठळक मुद्देव्यापाऱ्याच्या पाठीशी उभे राहिले रत्नागिरीतील व्यापारीव्यावसायिकांनीच घालून दिला नवा आदर्श