डीजीके महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:32 AM2021-07-30T04:32:57+5:302021-07-30T04:32:57+5:30
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभागांतर्गत गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला ...
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभागांतर्गत गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून भारत शिक्षण मंडळाच्या उपकार्याध्यक्ष नमिता कीर, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, गुरुकुल प्रबंधक मनोज जाधव, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, परीक्षा विभागप्रमुख ऋतुजा भोवड, सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून, रसायनशास्त्र विभाग (६ युनिट) प्रीती साळी, प्राणीशास्त्र विभाग (६युनिट) सायली नवनाथ लाड या प्रथम आल्या आहेत. वाणिज्य विभागाचा निकाल ९४.९० टक्के लागला असून, अकाऊंटन्सी ग्रुपमध्ये सोनाली माधव शिंदे ,बी. एम. ग्रुपमध्ये देवराज संदीप सुर्वे हे प्रथम आले आहेत.
मूळ दापोली येथील वाणिज्य शाखेचे ज्येष्ठ शिक्षक हरिप्रसाद लढ्ढा यांनी ठेवलेले कै. अयोध्या शिवलाल लढ्ढा पारितोषिक वाणिज्य शाखेचा देवराज सुर्वे याला मिळाले. संस्थेचे सचिव सुनील उर्फ दादा वणजू, डॉ. सुभाष देव, ॲड. श्रीनिवास घैसास यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.