मुंबई - गोवा महामार्ग अखेर सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:36 PM2019-07-29T15:36:16+5:302019-07-29T15:37:35+5:30

चिपळूण : अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील हॉटेल ओमेगा इनजवळ शनिवारी दुपारी ३ वाजता दरड कोसळून मुंबई - गोवा ...

Mumbai - Goa highway finally starts | मुंबई - गोवा महामार्ग अखेर सुरु

मुंबई - गोवा महामार्ग अखेर सुरु

Next
ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्ग अखेर सुरुअतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली होती

चिपळूण : अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील हॉटेल ओमेगा इनजवळ शनिवारी दुपारी ३ वाजता दरड कोसळून मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. १३ तासांनंतर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दरड पूर्णपणे बाजूला करण्यात यंत्रणेला यश आल्याने वाहतूक पूर्ववत सुरु झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार भास्कर जाधव यांनी या भागाची पाहणी केली.

चिपळूण शहरात शनिवारी पुराचे पाणी घुसले होते. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे बहादूरशेख पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास परशुराम घाटातील एका वळणावर डोंगरातील मातीचा एक भाग रस्त्यावर आला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये पाच जेसीबी, पाच पोकलेन, रोलर या यंत्राच्या सहाय्याने दरड हटविण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीचे ठेकेदार आदींनी दरड हटविण्यासाठी प्रयत्न केले. तहसीलदार जीवन देसाई, प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दरडग्रस्त भागाची पाहणी केली. तब्बल १३ तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरु झाली. एस. टी.च्या गाड्याही बंद होत्या. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दरडीची पाहणी करुन प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Mumbai - Goa highway finally starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.