मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष विज्ञान परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:32 AM2021-07-28T04:32:56+5:302021-07-28T04:32:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुंबई विद्यापीठातर्फे मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर-६ परीक्षेचा निकाल जाहीर ...

Mumbai University third year science exam results announced | मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष विज्ञान परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष विज्ञान परीक्षेचा निकाल जाहीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठातर्फे मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर-६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.

भौतिकशास्त्र विभाग निकाल १०० टक्के लागला असून, प्रथम क्रमांक खान मोहम्मद अझान, द्वितीय क्रमांक कदम भावेश राजेंद्र , तृतीय क्रमांक वैद्य सुरभी नितीन यांनी मिळविला. रसायनशास्त्र विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, प्रथम क्रमांक वैद्य सुशील सुनील, द्वितीय क्रमांक अलीम मिथिला मिलिंद, तृतीय क्रमांक बापर्डेकर एस. पी. यांनी मिळविला. वनस्पतीशास्त्र विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक उझमा हुश्ये, द्वितीय क्रमांक जुवेरिया गडकरी, मिसबा मुकादम, सफा सारंग, सिमरन आवटी तर तृतीय संज्योत खेडेकर यांनी प्राप्त केला आहे.

प्राणीशास्त्र विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, प्रथम क्रमांक जुवेरिया जमादार, द्वितीय क्रमांक सानिया मुल्ला, फिझा नाखवा, तृतीय अश्विनी निवेंडकर यांनी मिळविला. गणित विभागाचा निकाल ८५ टक्के लागला असून, प्रथम क्रमांक श्रुती यादव, द्वितीय क्रमांक तीर्था सोमण, तृतीय क्रमांक रसिका पाटणकर यांनी मिळविला. मायक्रोबायोलॉजी विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, प्रथम क्रमांक मनस्वी वाडेकर, पायल घोसाळे, द्वितीय क्रमांक गौरी गोगटे, केतकी मांडवकर, तृतीय क्रमांक श्रावणी देसाई यांनी पटकाविला. बायोकेमिस्ट्री विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, प्रथम क्रमांक संचिता चव्हाण, द्वितीय क्रमांक आयेशा शेख, तृतीय स्नेहा काकंडी यांनी मिळविला. बायोटेक्नॉलॉजी विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, प्रथम क्रमांक सर्वेश मयेकर, द्वितीय क्रमांक सिद्धी राऊळ, अलीदा पलापिल्ली, तृतीय क्रमांक मानसी बेंडल, समीक्षा जाधव, प्रतीक माशेलकर, तालबिया मुल्ला, स्वरूपा पटवर्धन, अंकिता शिवलकर यांनी पटकाविला.

इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभाग ९८.१८ टक्के लागला असून, प्रथम क्रमांक मृणाल कीर, द्वितीय क्रमांक अक्षय वैद्य, तृतीय अथर्व खेर यांनी मिळविला. कॉम्प्युटर सायन्स विभाग निकाल ९४ टक्के लागला असून प्रथम क्रमांक पायल लांजेकर, अल्फा मालगुंडकर, आकाश साबळे, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा गुरव, तृतीय क्रमांक वैभवी पाटील आणि सियानी रेडीज यांनी मिळविला.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Mumbai University third year science exam results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.