राजापुरातील पूरजन्य परिस्थितीसाठी एनडीआरएफ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:06+5:302021-06-16T04:42:06+5:30
राजापूर : परिसरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे राजापूरमधील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धोका ...
राजापूर : परिसरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे राजापूरमधील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धोका निर्माण होऊ शकतो. राजापूरची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, राजापूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी एनडीआरएफची एक तुकडी राजापूरमध्ये तैनात करण्यात आली आहे.
गेले दोन दिवस राजापूर तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अर्जुना नदीच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राजापुरात एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. या पथकाने मंगळवारी पूरजन्य भागाची पाहणी केली. आपत्ती ओढवली तर एनडीआरएफची ही तुकडी पूर्णपणे सज्ज झाली आहे. बोट तसेच बचावात्मक साहित्य या पथकाकडे उपलब्ध आहे.