आता महिनाभर घरातच करावी लागणार दाढी, केस कटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:11+5:302021-04-09T04:33:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने ३० एप्रिलपर्यंत मिनी लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनमुळे केशकर्तनालय पुन्हा बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने ३० एप्रिलपर्यंत मिनी लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनमुळे केशकर्तनालय पुन्हा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांना महिनाभर घरातच दाढी आणि केस कटिंग करावे लागणार आहे. मात्र, या मिनी लाॅकडाऊनमुळे रत्नागिरी शहरातील १६० केशकर्तनालयांतील २५० कामगारांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ येणार आहे.
काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरुवातीला शनिवार व रविवार दाेन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र, त्यानंतर बदल करून साेमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे केशकर्तनालय आणि ब्यूटी पार्लर पुन्हा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या निर्णयामुळे व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयाला विराेध दर्शविला आहे. दुकाने बंद ठेवल्यास घरभाडे, दुकानभाडे, वीज बिल, कामगारांचे पगार हे खर्च कसे भागवायचे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या केशकर्तनालय व्यावसायिकांसमाेर आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नसल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
अरुण आडिवरेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने ३० एप्रिलपर्यंत मिनी लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनमुळे केशकर्तनालय पुन्हा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांना महिनाभर घरातच दाढी आणि केस कटिंग करावे लागणार आहे. मात्र, या मिनी लाॅकडाऊनमुळे रत्नागिरी शहरातील १६० केशकर्तनालयातील २५० कामगारांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ येणार आहे.
काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरुवातीला शनिवार व रविवार दाेन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र, त्यानंतर बदल करून साेमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे केश कर्तनालय आणि ब्यूटी पार्लर पुन्हा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या निर्णयामुळे व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयाला विराेध दर्शविला आहे. दुकाने बंद ठेवल्यास घरभाडे, दुकानेभाडे, वीज बिल, कामगारांचे पगार हे खर्च कसे भागवायचे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या केशकर्तनालय व्यावसायिकांसमाेर आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नसल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
आत्महत्या हाच पर्याय
केशकर्तनालय हा पारंपरिक व्यवसाय आहे. या व्यवसायावरच अनेकजण अवलंबून आहेत. सकाळी कमवायचे आणि सायंकाळी घरात अन्न शिजवायचे अशी परिस्थिती आहे. गतवेळी केलेल्या लाॅकडाऊनमुळे काही व्यावसायिकांनी आत्महत्याही केल्या आहेत. आता पुन्हा दुकाने बंद ठेवल्यास आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. शासनाने इतरांप्रमाणे केशकर्तनालय सुरू करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.
केशकर्तनालय हा व्यवसायच आता संकटात सापडला आहे. सुरुवातीला शनिवार, रविवार दाेन दिवस दुकान बंद ठेवणार हाेते. त्याच्याशी आम्ही सहमत हाेताे. मात्र, आता महिनाभर दुकान बंद ठेवण्यात येणार आहेत. पहिल्या लाॅकडाऊनमुळे आधीच बेजार झालाे आहाेत. आता पुन्हा दुकाने बंद ठेवली तरी जगायचे कसे?
- बाळकृष्ण चव्हाण, व्यावसायिक
आता भीक मागण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. बाजारात इतर सर्व दुकाने सुरू आहेत. फक्त ब्यूटी पार्लर आणि केशकर्तनालयच बंद ठेवण्यात येत आहेत. जर दुकाने बंदच ठेवायची असतील तर मेडिकल, दूध वगळता सर्वच बंद ठेवा. सुरुवातीच्या काळात झालेले हाल पुन्हा साेसण्याची मानसिकता नाही.
- तेजस आपणकर, व्यावसायिक
रत्नागिरीत तरी सध्या लाॅकडाऊनची गरज वाटत नाही. जेथे रुग्णसंख्या जास्त आहे त्या मेट्राे सिटीत लाॅकडाऊन करणे याेग्य आहे. जानेवारीपासून लाेकं कुठं सावरायला लागली हाेती. आता पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास आमच्यासारख्या व्यावसायिकांचे हाल हाेतील. केशकर्तनालय हा काही फार माेठा व्यवसाय नसल्याने जीवन जगणे असह्य हाेईल.
- समीर चव्हाण