४४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:05+5:302021-06-16T04:42:05+5:30
रत्नागिरी : तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेले नाही, अशी बतावणी करून अज्ञाताने प्रौढाकडून मोबाईलवर आलेला क्रमांक घेऊन ...
रत्नागिरी : तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेले नाही, अशी बतावणी करून अज्ञाताने प्रौढाकडून मोबाईलवर आलेला क्रमांक घेऊन ४४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना शनिवारी घडली.
याबाबत कैलास श्रीधर किनरे (४०, रा. टिळक आळी, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने त्यांच्या मोबाईलवर फोन करून तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेले नाही, असे सांगितले. त्यानंतर किनरे यांचा आधार कार्ड नंबर घेऊन तो लिंक झाल्यावर किनरे यांच्याकडून त्यांच्या मोबाईलवर आलेला सांकेतिक क्रमांक घेतला. त्यानंतर किनरे यांच्या बँक खात्यातून ४४ हजार ९९५ रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किनरे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे अधिक तपास करीत आहेत.