स्वच्छ भारत अभियान : देवरूखात साकारणार सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 01:23 PM2020-01-30T13:23:53+5:302020-01-30T13:28:03+5:30
यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
देवरूख : देवरूख नगरपंचायतीला स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३ घंटागाड्या उपलब्ध झाल्या असून, गाड्या देवरूख शहरात दाखल झाल्या आहेत. ही वाहने २६ जानेवारीपासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्यामुळे देवरूखच्या कचºयाचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागला आहे. या कचºयावर प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मितीचा प्रकल्प देवरूख नगरपंचायतीतर्फे लवकरच साकारला जाणार आहे.
देवरूख शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपंचायतीमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहरातून कचरा गोळा करण्याठी सध्या ४ घंटागाड्या व १ ट्रॅक्टर कार्यरत आहे. शहराचा विचार करता या वाहनांची संख्या अपुरी पडत होती. हीच गरज ओळखून देवरूख नगर पंचायत प्रशासनाने १८ लाख रूपये कि मतीची तीन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने देवरूखनगरीत दाखल झाली आहेत.
नवीन घंटागाडीची कचरा वाहून नेण्याची क्षमता एक टन इतकी आहे. गाडीतील कचरा हायड्रोलिक पध्दतीने बाहेर टाकला जातो. यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
८५ लाखांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत ३ घंटागाड्या, ५ हजार स्वेकर फुटाची बंदिस्त इमारत, एक शेडर मशीन, एक बेलिंग मशीन, क्रशिंग मशिन, वेविंग मशीन, ९ कंपोस्ट पीठ, पशुकार्ट मंजूर झाले आहे.
- मृणाल शेट्ये, नगराध्यक्ष