रत्नागिरी जिल्हा बँकेला प्रेस्टीजिअस बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:36 AM2021-09-08T04:36:55+5:302021-09-08T04:36:55+5:30
रत्नागिरी : कोविड १९ च्या संक्रमण कालावधीतही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवसुली, ठेवी व भागभांडवलात वृद्धी करून सहकार ...
रत्नागिरी : कोविड १९ च्या संक्रमण कालावधीतही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवसुली, ठेवी व भागभांडवलात वृद्धी करून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बँको संस्थेतर्फे प्रेस्टीजिअस बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार २०२० देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार साेहळा म्हैसूर येथे आयोजित करण्यात आला हाेता.
सहकार क्षेत्रामध्ये भरीव व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातील सहकारी बँका, सहकारी संस्थांचे मूल्यमापन केले जाते. त्यानंतर बँको या संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक प्रेस्टीजिअस बॅंकाे ब्ल्यू रिबन पुरस्काराने गाैरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला बँकेचे संचालक सुधीर कालेकर, राजेंद्र सुर्वे, महादेव सप्रे, डॉ. अनिल जोशी, गणेश लाखण, आदेश आंबोळकर, मधुकर टिळेकर, अमजद बोरकर, संचालिका नेहा माने, बँकेचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली बँक यशस्वी वाटचाल करीत आहे.