बँकांसमोर लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:02+5:302021-03-31T04:32:02+5:30
रत्नागिरी : तीन दिवसांनंतर सुरू झालेल्या बँकांसमोर मंगळवारी रांगा लागल्या होत्या. मार्चअखेर असल्याने व्यापाऱ्यांची विशेष धावपळ उडाली असून, बँका ...
रत्नागिरी : तीन दिवसांनंतर सुरू झालेल्या बँकांसमोर मंगळवारी रांगा लागल्या होत्या. मार्चअखेर असल्याने व्यापाऱ्यांची विशेष धावपळ उडाली असून, बँका बंद असल्याने रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी मंगळवारी बँकांमध्ये झुंबड उडाली होती.
आधी बँकांच्या संपामुळे बँकेचे कामकाज बंद होते. त्यानंतर चौथा शनिवार, होळी, धुलीवंदन यामुळे रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस बँका बंद होत्या. याच आठवड्यात गुरुवार व शुक्रवारी बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे केवळ मंगळवार आणि बुधवार असे दोनच दिवस बँका सुरू असल्याने मंगळवारी सकाळपासून बँकांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या.
आर्थिक वर्षअखेर असल्याने धनादेश जमा करणे, वसुलीची रक्कम जमा करणे यासारख्या कामांमुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली आहे. मात्र बँकांचे सुट्ट्यांचे दिवस अधिक असल्याने कामाचा बोजवारा उडत आहे. त्यामुळेमंगळवारी अनेक बँकांसमोर रांगा दिसत हाेत्या.
......................
फोटो आहे.