गणेशाेत्सवासाठी येणाऱ्यांसमाेर महामार्गावर अडचणींची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:36 AM2021-09-08T04:36:53+5:302021-09-08T04:36:53+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क हर्षल शिराेडकर / खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात भोस्ते घाटात अनेक ठिकाणी ...

A race of difficulties on the highway for those coming for Ganesha festival | गणेशाेत्सवासाठी येणाऱ्यांसमाेर महामार्गावर अडचणींची शर्यत

गणेशाेत्सवासाठी येणाऱ्यांसमाेर महामार्गावर अडचणींची शर्यत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

हर्षल शिराेडकर / खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात भोस्ते घाटात अनेक ठिकाणी वाहतुकीला धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या घाटात नियंत्रित वेगाने धावणारी वाहनेही रस्त्यालगत कठड्याला धडकत व उलटत असल्याने हा मार्ग वाहतुकीला धोकादायक बनला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गावरील अपघातस्थळांचा आढावा राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेण्याची गरज आहे. मार्ग सुरक्षित व वाहतुकीस योग्य ठेवण्याच्या सूचना करण्याची मागणी हाेत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे या ठिकाणांहून नागरिक कोकणातील आपल्या मूळगावी येतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवापूर्वी व नंतर चार ते पाच दिवस खासगी वाहनांची संख्या वाढलेली असते. मुंबई व पुणे या महानगरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील अनेक कुटुंबे नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाली आहेत. सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कशेडी, परशुराम व भोस्ते या तीन घाटांमध्ये वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

खेडमधील भोस्ते घाट गेल्या काही दिवसांमध्ये लहान मोठ्या अपघातामुळे सतत चर्चेत राहिला आहे. महामार्गावरील या घाटात सुमारे ८० टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा संबंधित कंपनीने केला असला तरी पावसाळ्याच्या कालावधीत अनेकदा रस्त्यावर दरडी कोसळल्याने चार पदरी रस्त्यांपैकी दोन पदरी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याची नामुष्की या ठेकेदारावर ओढवली होती. घाटातील अनेक वळणे पूर्वीच्या रस्त्यापेक्षाही धोकादायक बनली असून, नियंत्रित वेगात वाहने चालवणाऱ्या चालकांचेही वाहनांवरील नियंत्रण सुटून ते रस्त्यालगत उलटत आहेत. भोस्ते घाटातील सर्वात मोठे व अवघड वळण असलेल्या रस्त्याच्या लगत सुरक्षेसाठी दरीच्या बाजुला उंच कठडा उभारला आहे. मात्र, या कठड्यावरच अनेक अवजड वाहने धडकत असून, त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

मुंबई - गोवा महामार्गावर लोटे औद्योगिक वसाहत या ठिकाणी महामार्गाच्या ठेकेदाराने गतिरोधक उभारले असून, लहान मोठी वाहने या गतिरोधकावरून धावताना आपटत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. गेल्या चार महिन्यात सुरू असलेली अपघातांची मालिका थांबतच नसल्यामुळे आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना आपली वाहने विनाअपघात व सुरक्षितपणे आपल्या गावी नेण्यासाठी नक्कीच अडचणींची शर्यत पार करावी लागेल.

Web Title: A race of difficulties on the highway for those coming for Ganesha festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.