रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रात्रीस खेळ चाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 12:53 PM2021-06-24T12:53:49+5:302021-06-24T12:55:26+5:30
Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून, गेल्या वर्षाच्या (जून २०२०) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवड्यांमध्ये जिल्ह्यात सरासरी ८०८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री जोरदार पडण्यास सुरूवात केली़ सकाळपर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते.
रत्नागिरी : जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून, गेल्या वर्षाच्या (जून २०२०) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवड्यांमध्ये जिल्ह्यात सरासरी ८०८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री जोरदार पडण्यास सुरूवात केली़ सकाळपर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते.
गेल्या ३ आठवड्यात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात १११९.३ मिलीमीटर नोंदला गेला. मागील वर्षी या तालुक्यात याच कालावधीत ४६४.१२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात ७२६ मिलीमीटर (४६३.३२), दापोली ५३०.६ मिलीमीटर (५६०.६९), खेड १११९.३ मिलीमीटर (४६४.१२), गुहागर ९३३.५ मिलीमीटर (६५८.७), चिपळूण ७५२.७ मिलीमीटर (५६७.०६), संगमेश्वर ८४७.८ मिलीमीटर (७२७.१), रत्नागिरी ९३१ मिलीमीटर (७१८.८), लांजा ७२५.६ मिलीमीटर (६६७.४) आणि राजापूर तालुक्यात ६५८.५ मिलीमीटर (७६९.२५) इतका पाऊस पडला आहे़
जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फक्त दापोली आणि राजापूर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी पाऊस आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ६२१.८३ मिलीमीटरच्या सरासरीने ५५९६.४४ मिलीमीटर पाऊस झाला. चालू वर्षात ८०८.०२ मिलीमीटरच्या सरासरीने ७२७२.२० मिलीमीटर अर्थात १६९५.७६ मिलीमीटर सरासरी पाऊस अधिक आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे़ सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे श्रावणसरी कोसळत असल्याचा आनंद अनुभवावा लागत आहे़ मात्र, बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे़ रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे़ गुरूवारी सकाळी पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने सखली भागात साचलेले पाणी ओसरले होते़ पाऊस थांबताच स्त्रियांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करून घेतली़