चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या खेड तालुकाध्यक्षपदी राजेश निवळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:34 AM2021-09-05T04:34:58+5:302021-09-05T04:34:58+5:30
टेंभ्ये : माध्यमिक व उच्च माध्यमिक चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या खेड तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी राजेश शांताराम ...
टेंभ्ये : माध्यमिक व उच्च माध्यमिक चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या खेड तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी राजेश शांताराम निवळकर (एस. आय. हायस्कूल, फुरूस) तर सचिवपदी अजित परशुराम यादव (न्यू इंग्लिश स्कूल, आंबवली) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व एल. पी. इंग्लिश स्कूल, खेडचे मुख्याध्यापक शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दिनेश वेताळे, जिल्हा सदस्य भिकाजी निकम, प्रसन्न शिंदे, समीर खेडेकर, शशिकांत पवार व चिपळूण तालुका कार्यकारिणी अध्यक्ष प्रमोद पवार उपस्थित होते.
नव्याने निवडण्यात आलेल्या खेड तालुका कार्यकारिणीमध्ये खजिनदारपदी एल. पी. इंग्लिश स्कूलचे जयंत म्हातले, उपाध्यक्षपदी परशुराम शांताराम पाष्टे (बोरघर हायस्कूल), सहसचिवपदी सहदेव नारायण पवार (चंदुलाल शेठ हायस्कूल), सदस्यपदी श्रीधर भोसले (तिसंगी हायस्कूल), सागर खेडेकर (खोपी हायस्कूल), सुभाष रामचंद्र मोरे (कोरेगाव हायस्कूल), गजानन पंदेरे (चंदुलाल शेठ हायस्कूल), सुधीर रामचंद्र जंगम (तळी हायस्कूल) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव पवार यांनी केले तर दिनेश वेताळे यांनी आभार मानले.