रत्नागिरी : रत्नागिरीत कोरोनाबाधीत रुग्ण वाढतच असून, शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार त्यात आणखी १३ रुग्णांची भर पडली आहे. आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या १४५ झाली आहे.शनिवारी सकाळच्या सत्रात प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ११६ अहवालांपैकी ११५ जणांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले होते. मात्र, रात्री उशिरा आलेल्या अहवालात तब्बल १३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला धक्का बसला आहे.नव्याने आढळलेल्या या १३ रुग्णांमध्ये ८ जण रत्नागिरीतील आहेत. उर्वरितांमध्ये राजापूर, दापोलीतील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. नव्याने आढळलेले सर्व रुग्ण मुंबईतून आलेले असून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा आकडा पोहोचला १४५ वर - आणखी १३ कोरोनाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 1:06 PM
रत्नागिरी : रत्नागिरीत कोरोनाबाधीत रुग्ण वाढतच असून, शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार त्यात आणखी १३ रुग्णांची भर पडली आहे. आता ...
ठळक मुद्दे नव्याने आढळलेले सर्व रुग्ण मुंबईतून आलेले असून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.