रत्नागिरी मतदारसंघाला दुसºयांदा मंत्रीपद ? मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा : उदय सामंत यांचे नाव पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:45 AM2017-12-16T00:45:21+5:302017-12-16T00:49:09+5:30

रत्नागिरी : महाराष्टÑ राज्य स्थापनेनंतर तब्बल ५३ वर्षांनी २०१३ साली रत्नागिरी विधानसभा मतदार संघाला सर्वप्रथम मंत्रीपद मिळाले होते.

Ratnagiri constituency is the second most powerful minister Discussion of extension of Cabinet: Uday Samant's name will be forwarded | रत्नागिरी मतदारसंघाला दुसºयांदा मंत्रीपद ? मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा : उदय सामंत यांचे नाव पुढे

रत्नागिरी मतदारसंघाला दुसºयांदा मंत्रीपद ? मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा : उदय सामंत यांचे नाव पुढे

Next

प्रकाश वराडकर ।
रत्नागिरी : महाराष्टÑ राज्य स्थापनेनंतर तब्बल ५३ वर्षांनी २०१३ साली रत्नागिरी विधानसभा मतदार संघाला सर्वप्रथम मंत्रीपद मिळाले होते. राष्टÑवादी कॉँग्रेसचे तत्कालिन आमदार उदय सामंत हे मंत्री झाले होते. आता पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे घोंगावत असून, गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर होणाºया संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात आता सेनेत असलेले आमदार उदय सामंत यांच्या रुपाने रत्नागिरीला दुसºयांदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्टÑाच्या सागरी किनाºयावरील ओखी वादळ शमते न शमते तोच राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे घोंगावू लागले आहेत. गुजरात निवडणुका तसेच विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर हा विस्तार होण्याचे संकेत मिळत असून, मंत्रीपदासाठी शिवसेनेतर्फे चर्चेत असलेल्या तीन नेत्यांमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्र्र्चा शिवसेना वर्तुळात आहे.

आतापर्यंत सामंत यांच्यासह राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्यातील एकूण सहा जणांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. याआधी राजापूर, दापोली, चिपळूण व गुहागर मतदारसंघांना मंत्रीपदे मिळाली होती. २०१३मध्ये राष्टÑवादीत असलेले आमदार उदय सामंत यांच्या रुपाने रत्नागिरीला सर्वप्रथम मंत्रीपद मिळाले होते. जिल्ह्यात याआधी ज्यांना मंत्रीपदे मिळाली, त्यात दापोलीचे बाबुराव बेलोसे, राजापूरचे ल. र. हातणकर (कॉँग्रेस), चिपळूणचे हुसेन दलवाई (कॉँग्रेस), देवरुख - संगमेश्वरचे रवींद्र माने (शिवसेना), खेडचे रामदास कदम (शिवसेना), गुहागर मतदारसंघातून निवडून आलेले भास्कर जाधव (राष्टÑवादी काँग्रेस) यांचा समावेश आहे. रत्नागिरीत निवडून आलेले शिवसेनेचे तत्कालिन आमदार शिवाजी गोताड यांना राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्षपद मिळाले होते, तर त्याआधी बॅ. ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्रीपदी असताना तत्कालिन आमदार श्यामराव पेजे यांची मंत्रीपदाची संधी हुकली होती. २०१३मध्ये मंत्री झाल्यानंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी राष्टÑवादीला रामराम केला व शिवसेनेत प्रवेश करून रत्नागिरीतून विधानसभा निवडणूक जिंकली.

मंत्रीपद : सेनेचे अन्य आमदारही इच्छुक

सेनेत प्रवेश केल्यानंतर सामंत यांना
तत्काळ मंत्रीपद दिले गेले असते तर पक्षात असंतोषाची शक्यता होती.
शिवसेनेतून मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील आणखी काही आमदारही मातोश्रीकडे डोळे लावून बसले आहेत.
सेनेत आपली ताकद सिध्द केल्यानंतर आता उदय सामंत यांना मंत्रीपदाच्या संधीचे दार उघडले जाण्याची दाट शक्यता.

महाराष्टÑ विधानसभेच्या २०१४मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी आमदार उदय सामंत यांनी राष्टÑवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. सेनेतर्फे रत्नागिरीतून विधानसभेवर ते पुन्हा निवडून आले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांच्या काळात मंत्रीपदाने त्यांना अनेकदा हुलकावणी दिली आहे. मात्र, या काळात त्यांनी आपल्या कामाच्या रूपाने जिल्ह्यातील सेनेत आपले स्थान मजबूत केल्याने यावेळी संधी नक्की असल्याची चर्चा आहे.

Web Title: Ratnagiri constituency is the second most powerful minister Discussion of extension of Cabinet: Uday Samant's name will be forwarded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.