रत्नागिरी : जिल्ह्यात मागील २४ तासात तब्बल ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ऐन शिमगोत्सवात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार गुरूवारी जिल्ह्यात ६४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०,५५५ वर जाऊन पोहोचली आहे. गुरूवारी आलेल्या अहवालानुसार ५७ रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर ७ रुग्ण ॲन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.दरम्यान, रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एका शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने ही शाळा ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा संघ डेरवण (ता. चिपळूण) येथे क्रीडा स्पर्धेसाठी जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक व विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये एक शिक्षक पॉझिटिव्ह आला आहे.
Coronavirus Cases-रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी सापडले ६४ कोरोनाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 6:30 PM
Coronavirus Cases Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात तब्बल ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ऐन शिमगोत्सवात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी सापडले ६४ कोरोनाचे रुग्णशिक्षक पॉझिटिव्ह आल्याने शाळा तीन दिवस बंद