रत्नागिरी : वाहनांची चोरी करून अफरातफर करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आदील उल्ला सदाफ उल्ला खान (४८), परवेज रहेमतुल्ला खान उर्फ हाजी (४८, दोघेही रा. नीलमंगला बंगळुरू) आणि इसहाक कुतुबुद्दीन मुजावर (४३, रा. कोल्हापूर) या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ नोव्हेंबर २०१७ रोजी डंपर चोरीला गेला होता. वाहनांची चोरी गुन्ह्यामध्ये आंतरराज्य टोळी सक्रीय असण्याची शक्यता होती. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तपास करीत होती. या गुन्ह्यातील चोरीला गेलेला डंपर बंगळुरू येथे असल्याची माहिती पोलिसांना लागली.याप्रकरणी ३ वेगवेगळी पथके तयार करून कोल्हापूर व बंगळुरू या ठिकाणी रवाना केली होती. त्याप्रमाणे २३ डिसेंबर रोजी बंगळुरू (कर्नाटक) येथून आदील खान व परवेज खान उर्फ हाजी व २४ डिसेंबर रोजी इसहाक मुजावर या तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून चोरीला गेलेला डंपर पोलिसांनी जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांनी रत्नागिरी, देवरूख, चिपळूण व रत्नागिरी ग्रामीण हद्दीतून वाहने चोरी केल्याची कबुली दिली आहे.
रत्नागिरी : वाहनांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:23 PM
वाहनांची चोरी करून अफरातफर करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आदील उल्ला सदाफ उल्ला खान (४८), परवेज रहेमतुल्ला खान उर्फ हाजी (४८, दोघेही रा. नीलमंगला बंगळुरू) आणि इसहाक कुतुबुद्दीन मुजावर (४३, रा. कोल्हापूर) या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
ठळक मुद्देरत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत डंपर चोरीला गेलागुन्ह्यामध्ये आंतरराज्य टोळी सक्रीय असण्याची शक्यता तिघांच्या मुसक्या आवळल्या, चोरीला गेलेला डंपर जप्त