रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:57 PM2019-04-23T14:57:02+5:302019-04-23T16:56:54+5:30

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान झाले. मतदानाचा उत्साह सायंकाळच्या वेळेत जास्त वाढेल असा अंदाज आहे, दुपारपर्यंत कोठेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे वृत्त नाही.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency has 35.69 percent voting | रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान

रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान

Next
ठळक मुद्देरत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३५.६९ टक्के मतदानकोठेही मतदान यंत्रात बिघाड नाही

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ३ वाजेपर्यंत झालेले मतदान ४५.१० टक्के मतदान झाले.  मतदानाचा उत्साह सायंकाळच्या वेळेत जास्त वाढेल असा अंदाज आहे, दुपारपर्यंत कोठेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे वृत्त नाही.

सिंधुदुर्गात ३ वाजेपर्यंत ५०.१६ टक्के मतदान

 सिंधुदुर्गनगरी, ता.२३: सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दु. ३ वाजेपर्यंत ५०.१६ टक्के एवढे मतदान झाले आहे. ६ लाख ६६ हजार ७२० मतदारांपैकी ३ लाख ३४ हजार ४५१ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १ लाख ७३ हजार ६६६ पुरुष व १ लाख ६० हजार ६८५ महिला मतदारांनी मतदान केले आहे. अजून दोन तास शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित ५० टक्के मतदारांपैकी किती मतदार मतदानाचा हक्क बजावतात यावर जिल्ह्याच्या एकूण मतदानाची टक्केवारी निश्चित होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भर दुपारीही मतदार बाहेर येऊन मतदान करत आहेत.  दुपार १ वाजेपर्यंत ४१.४५ टक्के मतदान झाले.११ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान झाले होते. ११ वाजल्यानंतरही मतदानासाठी उत्तम प्रतिसाद लाभला आहे.सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.निवडणूक निरिक्षक  के.मजुनाथ यांनी सावंतवाडीतील दोन मतदान केंद्राना भेटी देत आढावा घेतला. 


रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरवात झाली. सुरुवातीला वेग थोडा कमी होता मात्र ८ ते १० यादरम्यान मतदानाचा वेग चांगला झाला. दुपारी १ वाजेपर्यंत या मतदारसंघात ३५.६९ टक्के मतदान झाले होते. मतदान यंत्रांत बिघाड झाल्याचे अजून कोणतेही वृत्त नाही.


दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे समीर तुकाराम हरपले या तरुणाचा मंगळवारी विवाह होता. त्याने विवाहाला जाण्यापूर्वी मतदानाचा अधिकार बजावला. तसेच दापोली तालुक्यातील जालगाव येथे सुप्रिया गुरव या तरुणीनेही मतदानाला जाण्यापूर्वी मतदान केले. 

खास महिलांसाठी सुरु करण्यात आलेली सखी मतदान केंद्रे मंगल कार्यक्रम असल्याप्रमाणे नटलेली होती. लग्नाचा असतो तसा मंडप, रांगोळी, फुग्यांची सजावट असलेली कामं असा आगळा थाट सखी मतदान केंद्रावर ठेवण्यात आला होता.

चिपळूण मध्ये दुपारी १ वाजेपर्यंत  ३४ टक्के  मतदान झाले आहे. दापोली विधानसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३८.३४ टक्के  मतदान झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ वाजेपर्यंत ४१.४५ टक्के मतदान

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दु.१ वाजेपर्यंत ४१.४५ टक्के मतदान झाले.११ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान झाले होते. ११ वाजल्यानंतरही मतदानासाठी उत्तम प्रतिसाद लाभला आहे. उर्वरित चार तासामध्ये किती मतदान वाढतेय यावर एकूण मतदान किती होणार, हे निश्चित होणार आहे.

वेंगसर येथे तब्बल दीड तास इव्हीएम मशिन बंद

वैभववाडी : तालुक्यात १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत. तर वेंगसर येथे मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल दीड तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. दरम्यान नवीन मशीन आणून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. तालुक्यात मतदान सुरळीत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
     
तालुक्यात सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांच्या अक्षरशः रांगा लागल्या. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आणि शांततेत मतदान सुरू आहे. कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून पोलिस तैनात करण्यात आला आहे. उन्हामुळे सकाळच्या वेळात मतदान उरकण्यासाठी घाई दिसून येत होती.

रायगड मतदारसंघात अंदाजे सरासरी मतदान दुपारी 1 पर्यंत ( 37.77%)

  • पेण 38.5%
  • अलिबाग 39.38%
  • श्रीवर्धन 37.10%
  • महाड 39.7%
  • दापोली 34.26%
  • गुहागर 37.40%

Web Title: Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency has 35.69 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.