रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींना निधी देण्यात येत असल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिल्हा परिषदेला या वित्त आयोगातून ३२ कोटी मिळाले असून, आणखी ३२ कोटी रुपयांचा निधी मार्च अखेरीस मिळणार आहेत.महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील ३५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन नवीन सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले आहेत. निवडणुकीमुळे पंधराव्या वित्त आयोगातील कामांची कार्यवाही थांबविण्यात आली होती. आता त्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
कारण या आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी कामांचे आराखडे तयार झाले असून, त्याची कार्यवाही करण्याचे ग्रामस्तरावर प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये ग्रामपंचायत कायदे, कार्यपध्दती, अर्थकारण, सरकारी योजना, ग्रामसेवक यांच्यासह इतर विकास योजनांबाबत अधिकारी, कर्मचारी हे प्रशिक्षण घेत आहेत.कोरोनामुळे या आयोगाचा निधी मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर ६४ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाले. त्यापाठोपाठ फेब्रुवारी महिन्यात आणखी ३२ कोटी ७२ लाख ६३ हजार रुपयांचा निधी विकासकामांसाठी देण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायतींना २६ कोटी १८ लाख, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी ३ कोटी २७ लाख रुपये मिळणार आहेत. जिल्हा परिषदेला दरवर्षी १५० कोटी रुपयांचा निधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर २०२१, मार्चअखेरीस ३२ कोटी रुपये शासनाकडून मिळणार आहेत....या कामांची तरतूदया निधीतून स्वच्छता, पाणीपुरवठा योजना, रस्ते, पाखाड्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांतील विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत. हा निधी खर्च करण्यासाठी त्यामध्ये पारदर्शकता असावी, यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा करण्यात आली आहे.