रत्नागिरी : शहरातील वाहनधारक रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच भटके श्वान आणि मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगर परिषदेकडे जोर धरू लागली आहे. मात्र, नगर परिषदेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाकडे आराखडा नाही
मंडणगड : तालुक्यातील अनेक गावांवर अद्यापही डोंगर खचून मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता असतानाही प्रशासनाकडून कोणत्याहीप्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही. केवळ नोटीस देण्यापलीकडे प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. त्याचा कसलाही आराखडा प्रशासनाकडे नाही.
पूरग्रस्तांना पाण्याची गरज
चिपळूण : शहराची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. ५ दिवस पूर्ण हताश अवस्थेत गेले. फोनला रेंज आणि लाईटसुध्दा विलंबाने आली. अतिशय कठीण अवस्था आहे. पाच दिवस लाईट नाही, पिण्याचे पाणी नाही. लोकांनी पावसाचे पाणी जमवून दिवस काढलेत.
लांजा काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदत
लांजा : लांजा काँग्रेसच्यावतीने पूरग्रस्त चिपळूण येथील लोकांना स्वखर्चाने साहित्याचे वाटप करण्यात आले. पुराच्या पाण्याने चिपळूण येथील लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी लांजा काँग्रेस धावून गेली आहे.
पेजे महाविद्यालयाची मदत
रत्नागिरी : तालुक्यातील शिवारआंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आहे. कळंबस्ते, काविळतळी व खेर्डी येथील लोकांना ही मदत देण्यात आली.