देवरूख : गेली तीन - चार दिवस तालुक्यातील जनतेला वाढलेल्या उष्म्याने हैराण केले होते. गुरूवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शिडकावा केला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सातत्याने असणारे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानभरपाईचा विचार करता सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा बागायतदारांमधून होत आहे.वाढलेल्या उन्हामुळे हा उकाडा खूपच वाढला होता. उकाड्याने संगमेश्वरवासीय पुरते हैराण झाले होते. मात्र, गुरूवारी दुपारनंतर वातावरण ढगाळ बनल्यामुळे पावसाची चिन्ह निर्माण झाली होती. सायंकाळी ६.३०च्या सुमारास देवरूख परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे काही नागरिकांना घरी परतत असताना पावसात भिजण्याचा आनंद घेता आला.चिपळुणातही पावसाची बरसातचिपळूण शहर परिसरात उन्हाचे चटके चांगलेच जाणवत होते. सकाळी कडाक्याचे ऊन पडले होते. मात्र, दुपारनंतर हवामान ढगाळ झाले होेते. सायंकाळी ७ वाजता पावसाने हजेरी लावली. हवामानात उष्म्याचे प्रमाण वाढले होते. दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणे अवघड झाले होते. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ७ वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
देवरूखात पावसाच्या शिडकाव्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 4:46 PM
गेली तीन - चार दिवस तालुक्यातील जनतेला वाढलेल्या उष्म्याने हैराण केले होते. गुरूवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शिडकावा केला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सातत्याने असणारे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानभरपाईचा विचार करता सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा बागायतदारांमधून होत आहे.
ठळक मुद्देदेवरूखात पावसाच्या शिडकाव्याने दिलासाचिपळुणातही पावसाची बरसात