जेसीआयतर्फे महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:28 AM2021-04-05T04:28:17+5:302021-04-05T04:28:17+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : येथील जेसीआय संस्थेतर्फे दापोली शहरातील व्यावसायिक क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजिका म्हणून काम करणाऱ्या पण आजपर्यंत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : येथील जेसीआय संस्थेतर्फे दापोली शहरातील व्यावसायिक क्षेत्रामध्ये यशस्वी
उद्योजिका म्हणून काम करणाऱ्या पण आजपर्यंत कधी ही प्रकाशझोतामध्ये न
आलेल्या महिलांचा व्यावसायिक महिला रत्न म्हणून सन्मान करण्यात आला.
आकांक्षा जाधव, सुप्रिया संकपाळ, नूतन वैद्य, मुग्धा धारप, शामल जालगावकर, दीपिका करमरकर यांच्यासह अन्य महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. गेली अनेक वर्षे स्वतःचं कुटुंब सांभाळून यशस्वी व्यवसायाची स्वप्नं पाहणाऱ्या या महिला म्हणजे आजच्या युवक पिढीला प्रेरणादायी आहेत. कुटुंबाकडून मिळालेली साथ आणि मदत हीच या यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मंडलिक, समीर कदम, आशिष अमृते, भूषण इस्वलकर, अभिषेक खटावकर, मयुरेश
शेठ, प्रसाद दाभोळे, सिद्धेश शिगवण उपस्थित होते.