चिपळुणात ‘शिवभोजन’ला लॉकडाऊनमध्येही प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:29 AM2021-04-19T04:29:01+5:302021-04-19T04:29:01+5:30
चिपळूण : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात चिपळूण शहर ...
चिपळूण : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात चिपळूण शहर परिसरात वास्तव्य करणारे गोरगरीब, मजूर, बेघर, स्थलांतरित कुटुंबे यांचे खाण्यावाचून हाल होऊ नयेत यासाठी आता मोफत शिवभोजन थाळीबरोबरच ती थाळी मिळण्याची वेळ आणि तिची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जेवण मिळणार आहे. चिपळुणात या उपक्रमाला लॉकडाऊनमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
..............................
पारदर्शक कारभारासाठी शिवभोजन थाळी ॲप
मोफत शिवभोजन योजनेसाठी ठिकठिकाणी वितरक नेमले आहेत. वाटप होणाऱ्या थाळीप्रमाणे शासनाकडून संबंधित वितरकाला पैसे दिले जाणार आहेत. या कामात पारदर्शकता रहावी यासाठी शासनाने शिवभोजन थाळी ॲप सुरू केले आहे. या ॲपद्वारे थाळी घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, मोबाइल नंबर, फोटो घेतला जात आहे. त्यामुळे दिवसाला किती लोकांनी थाळीचा लाभ घेतला याची परिपूर्ण माहिती एका क्लिकवर शासनाकडे जमा होत असल्याची माहिती वितरक बिपीन कापडी यांनी दिली.
...................................
चिपळुणातील शिवभोजन थाळी गोरगरिबांना आधार बनली आहे.