पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:21 AM2021-06-29T04:21:51+5:302021-06-29T04:21:51+5:30
रत्नागिरी : सरीवर कोसळणाऱ्या पावसाने साेमवारी दिवसभर विश्रांती घेतली. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ...
रत्नागिरी : सरीवर कोसळणाऱ्या पावसाने साेमवारी दिवसभर विश्रांती घेतली. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ६५.१० मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे.
पाऊस नसल्याने जिल्ह्यात कुठेही दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आधी झालेल्या पावसाचे पाणी भात खाचरात साचल्याने शेतीची कामे सध्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी भाताची राेपे चांगली वाढली असून, लावणीच्या कामाला वेग आला आहे.
गेल्या २४ तासात मंडणगड तालुक्यात १३.१० मिलिमीटर, दापोली ५.५०, खेड ४.४०, गुहागर ८.५०, चिपळूण ३.४०, संगमेश्वर १०.९०, रत्नागिरी १२.१०, राजापूर २.९०, लांजा ४.३० इतकी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक पाऊस मंडणगड तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस राजापूर तालुक्यात झाला आहे.