आरोग्यासह शाळेसाठी एक धाव, स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:48 AM2019-11-13T11:48:21+5:302019-11-13T11:50:07+5:30
मंडणगड तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मंचातर्फे जिल्हास्तरीय एकता मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दहागावच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलचा परिसर पहाटेपासून गजबजून गेला होता.
मंडणगड : तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मंचातर्फे जिल्हास्तरीय एकता मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दहागावच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलचा परिसर पहाटेपासून गजबजून गेला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम १८ वर्षावरील खुल्या गटातील स्पर्धकांनी धाव घेतली. त्यानंतर उर्वरित १८ वर्षापर्यंत व १४ वर्षाखालील गटांची स्पर्धा सुरु झाली.
या स्पर्धेसाठी दहागाव ते विसापूर असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. स्पर्धकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती. धुक्यातून धावणारे स्पर्धक रंगीत जर्सीमुळे आकर्षक दिसत होते.
या स्पर्धेसाठी माजी विद्यार्थी मंचचे अध्यक्ष सुभाष तांबे, उपाध्यक्ष अॅड. अभिजित गांधी, सचिव दीपक गोरिवले, सहसचिव नरेश चव्हाण, खजिनदार मनोज वेदक, सहखजिनदार नंदकुमार दळवी व अन्य पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
यावेळी डॉ. भावठाणकर, सभापती राजेश गुजर, राजेंद्र फणसे, सुभाष तांबे, अॅड. अभिजित गांधी, विनोद दळवी, बी. जे. पाटील, एस. बी. पाटील, दादा जगताप, दिलीप मराठे, विद्यार्थी मंचचे पदाधिकारी, शिक्षक, स्पर्धक उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते पहिले तीन क्रमांक
या स्पर्धेत १८ वर्षावरील खुल्या गटात पुरुषांमध्ये अविनाश पवार, सिद्धेश भुवड, मधुर चांदीवडे तर महिलांमध्ये स्नेहल माळी, स्नेहा दुसार, आश्विनी महागावकर, १८ वषार्खालील पुरुष गटात - रितेश नांगले, आशिष बेर्डे, प्रथमेश पारदुले, महिलांमध्ये रोहिणी पवार, सुचिता पवार, पिंकी हिलम, १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये आदित्य गोठल, रितेज खांबे, सुजल लोखंडे तर मुलींमध्ये कोमल राठोड, वेदिका सकपाळ, आयेशा बोथरे यांनी यश मिळवले.