सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेने आदिवासी वाड्यांमध्ये दिला चारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:27 AM2021-04-26T04:27:58+5:302021-04-26T04:27:58+5:30
शिरगाव : चिपळुणातील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेतर्फे आदिवासी बांधवांसाठी मदत कार्य सुरूच ठेवले आहे. सह्याद्री डोंगरदऱ्यात वसलेल्या आदिवासींना ...
शिरगाव : चिपळुणातील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेतर्फे आदिवासी बांधवांसाठी मदत कार्य सुरूच ठेवले आहे. सह्याद्री डोंगरदऱ्यात वसलेल्या आदिवासींना काेराेना काळातही मदत देत त्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला आहे.
कुंभार्ली घाट परिसरात असलेल्या आदिवासी वस्तीत किराणा साहित्य पुरवठा करण्यात आला. त्यानंतर डोंगरात आदिवासींच्या पाळीव जनावरांना चरायला पुरेसे गवत दिसत नसल्याची बाब समाेर आली. त्यासाठी संस्थाध्यक्ष सोनल प्रभुलकर व सदफ कडवेकर यांनी मदतीचे आवाहन केले हाेते. ज्ञानेश्वर वैद्य यांच्या मदतनिधी संकल्पनेतून ८ टन चारा संकलन करून त्याठिकाणी पाठविण्यात आला. भाट्ये धनगरवाड्यावर १३ कुटुंबांना अडीच टन, कासारखंडक येथे दीड टन, सोनपात्र येथे ५०० किलो चारा या संस्थेने उपलब्ध करून दिला. यासाठी मयुर कुंभार यांचे सहकार्य लाभले.