संगमेश्वरात पावसामुळे बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:25+5:302021-05-08T04:32:25+5:30

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गुरुवारी सायंकाळी सुमारे तासभर ...

In Sangameshwar, the lights went out due to rain | संगमेश्वरात पावसामुळे बत्ती गुल

संगमेश्वरात पावसामुळे बत्ती गुल

Next

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गुरुवारी सायंकाळी सुमारे तासभर ठिकठिकाणी पाऊस पडत होता. त्यामुळे महावितरणची बत्ती गुल झाली होती. वीज गेल्याने ढगाळ वातावरणामुळे उकाडा असह्य होत होता.

तालुक्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाचे ढग जमा झाले हाेते. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली़. सहा ते सात या तासाभराच्या वेळात देवरुख, साखरपा, वांझोळे, काटवली, कुंडी, निवे, कोसुंब, बुरंबी, देवळे, संगमेश्वर माखजन या भागात मुसळधार पाऊस काेसळत हाेता. यावेळी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.

तब्बल ६़३० खंडित झालेला विद्युत पुरवठा ८.१५ वाजता पूर्ववत झाला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे बीएसएनएलची रेंजही गायब झाली होती. दिवसभर विजेच्या लपंडावाबरोबरच बीएसएनएलच्या रेंजचा लपंडाव सुरूच होता.

Web Title: In Sangameshwar, the lights went out due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.