खवले मांजर तस्करी, आणखी तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:17+5:302021-04-04T04:32:17+5:30
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील येथील रेल्वे स्थानकाजवळील साईबा ढाब्यानजीक झालेल्या खवले मांजर तस्करीप्रकरणी येथील वनविभागाने शुक्रवारी आणखी तिघांना ताब्यात ...
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील येथील रेल्वे स्थानकाजवळील साईबा ढाब्यानजीक झालेल्या
खवले मांजर तस्करीप्रकरणी येथील वनविभागाने शुक्रवारी आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या ९ वर पोहोचली आहे. वनविभागाकडून अजूनही या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
लोटे, खोपी, फणसू येथून तिघांना ताब्यात घेण्यात आले. दिनेश दिलीप सुर्वे (३१, रा.खोपी), अमर जयंत जाधव (३१, चिपळूण ओझरवाडी), मणेश मोहन विचले (२५, फणसू-दापोली) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. खवले मांजर विक्रीसाठी नेत असल्याची कुणकुण लागताच, वनविभागाच्या पथकाने सहा जणांना शिताफीने अटक केली होती. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याच्या शक्यतेने वनविभागाने तपास गतिमान केला होता. त्यानुसार, आणखी तिघे वनविभागाच्या जाळ्यात अडकले. अधिक तपास येथील वनाधिकारी अनिल दळवी करत आहेत.