वन विभागातर्फे आज फुलपाखरांबाबत परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:21+5:302021-07-05T04:20:21+5:30

चिपळूण : येथील वन विभाग आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांचे संयुक्त विद्यमाने देवरुख (ता. संगमेश्वर) येथे परसदारी ...

Seminar on Butterflies by Forest Department today | वन विभागातर्फे आज फुलपाखरांबाबत परिसंवाद

वन विभागातर्फे आज फुलपाखरांबाबत परिसंवाद

Next

चिपळूण : येथील वन विभाग आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांचे संयुक्त विद्यमाने देवरुख (ता. संगमेश्वर) येथे परसदारी फुलपाखरू उद्यान ही संकल्पना यशस्वी करणारे वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे यांचा सोमवार, ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ‘जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती’ या विषयावर महत्त्वपूर्ण परिसंवाद व व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

मोरे यांनी महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेच्या सहकार्याने साद निसर्गाची अंतर्गत याच विषयावर विशेषांक लेखन केले असून, ते गेली ७ वर्षे यावर अभ्यास करत आहेत. मानव प्राणी संघर्ष, देवराई संवर्धन, हॉर्नबील, कोकणातील सड्यांची जैवविविधता यावर संशोधन सुरु असलेले मोरे या वेबिनारमधून ‘फुलपाखरांचे विश्व’ उलगडून सांगणार आहेत. या वेबिनारमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पर्यावरण आणि फुलपाखरू प्रेमी जिज्ञासूंनी Video call link: https://meet.google.com/ccm-nfmg-gfs ह्या लिंकद्वारे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांनी केले आहे.

Web Title: Seminar on Butterflies by Forest Department today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.