देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा महात्मा गांधी हायस्कूल येथे विलगीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहे़ आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेंटरचे लाेकार्पण करण्यात आले़
खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शाखाली या सेंटरसाठी आमदार राजन साळवी आणि पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांनी पाठपुरावा केला होता. याच ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर येथेच उपचार झाले पाहिजेत, यादृष्टीने आमदार राजन साळवी यांनी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार करून या सेंटरची मान्यता प्राप्त केली. साखरपासह परिसरातील नागरिकांना देवरुख, रत्नागिरी येथे जावे लागत असे, ही फरफट कमी होण्यास मदत होणार आहे.
यावेळी संगमेश्वर पंचायत समिती सभापती जयसिंग माने, महिला बालकल्याणच्या माजी सभापती रजनी चिंगळे, उपतालुकाप्रमुख काका कोलते, सरपंच विनायक गोवरे, शेखर आकटे, अजय सावंत, प्रवीण जोयशी, बापू शिंदे, नाना सुर्वे, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, साखरपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी़ बी़ अदाते, विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, सेवक, आरोग्य सेविका उपस्थित होत्या.