सात वर्षानंतर राजापूरची मुख्य बाजारपेठत पाणी, रत्नागिरीतील हातिस दर्गा पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:54 PM2019-08-05T13:54:56+5:302019-08-05T13:56:19+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अशरक्ष: झोडपून काढले आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी शहरात शिरले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत सन २०१२ नंतर ८ फुटापर्यंत पाणी भरले होते.

Seven years later, water in Rajapur's main market | सात वर्षानंतर राजापूरची मुख्य बाजारपेठत पाणी, रत्नागिरीतील हातिस दर्गा पाण्याखाली

सात वर्षानंतर राजापूरची मुख्य बाजारपेठत पाणी, रत्नागिरीतील हातिस दर्गा पाण्याखाली

Next
ठळक मुद्देसात वर्षानंतर राजापूरची मुख्य बाजारपेठत पाणी, रत्नागिरीतील हातिस दर्गा पाण्याखाली- हरचेरी, चांदेराईत पूर, संगमेश्वर, वांद्री बाजारपेठ पाण्याखाली, लांजा मठ येथील दत्तमंदिराला पाण्याचा वेढा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अशरक्ष: झोडपून काढले आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी शहरात शिरले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत सन २०१२ नंतर ८ फुटापर्यंत पाणी भरले होते.

जिल्ह्यात धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात नद्यांना पुराचे पाणी आल्याने गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने एस्. टी. बससेवा बंद करण्यात आली आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील निवळीनजीकच्या बावनदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रविवारी रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

रत्नागिरीतील हातिस दर्गा पाण्याखाली

तालुक्यातील जुवे येथे पाणी शिरल्याने तेथील दोन कुटुंबाना तत्काळ स्थलांतरीत करण्यात आले. रत्नागिरीतील हातिस येथील प्रसिद्ध असणारा दर्गाही रविवारी रात्री पुराच्या पाण्याने वेढला गेला. त्याचबरोबर हरचेरी, चांदेराई भागात पुराचे पाणी शिरल्याने बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. अनेक घरातून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरल्याने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. हरचेरी येथे पुराच्या पाण्यात दोन कुटुंब अडकली होती. या कुटुंबाला सोमवारी सकाळी सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले. तोणदे गावातही पुराचे पाणी शिरल्याने लोकांची धावपळ उडाली.

राजापुरातील मुख्य बाजारपेठेत पाणी

राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून, शहरात पुराचे पाणी वेगाने शिरत आहे. शुक्रवारपासूनच पुराचे पाणी शिरू लागल्याने व्यापाऱ्यांनी आधीच सावध होऊन सर्व सामान इतरत्र हलविले. मात्र, रविवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने राजापुरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले. सात वर्षानंतर मुख्य बाजारपेठेत ८ फुटापर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.

संगमेश्वर बाजारपेठ पुराखाली

संगमेश्वर तालुक्यातील वांद्री बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरले आहे. येथील सोमेश्वर मंदिराभोवतीही पुराचे पाणी आले आहे. संगमेश्वर आठवडा बाजार व आणि रामपेठेत भागात ३ ते ४ फुटापर्यंत पाणी आले आहे. देवरूख - संगमेश्वर मार्गावर लोवले, बुरंबी येथे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. उक्षी मोहल्ल्यात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. येथील स्थानिक तरूणांनी तातडीने रात्रीच मदत कार्याला सुरूवात केली. पाण्यामुळे या भागातील लोकांनी रात्र जागूनच काढली.

लांजात खोरनिनकोत दरड कोसळली

लांजा तालुक्यातील मठ - आंजणारी येथे पुराचे पाणी आल्याने दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. खोरनिनको येथे दरड कोसळून दोन घरे गाडली गेल्याची घटना सकाळी घडली आहे. त्याचबरोबर आंजणारी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पावस मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. देवधे फाटा येथे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरही एकेरी वाहतूक सुरू आहे.

चिपळूण शहरात पूर कायम

रात्रीच्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहर आणि लगतच्या खेर्डीमध्ये पूर आला आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीने रौद्ररूप धारण केल्याने सकाळी १० वाजल्यापासून पाणी शहरात शिरू लागले आहे. पुराच्या पाण्यामुळे खेर्डी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. चिपळूण - कराड हा मार्ग देखील बंद पडला आहे. कोकरे - नायशी रस्त्यावरील कोकरे हायस्कूल लगतच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकरे, खेरशेत, नायशी, वडेरू, पुर्ये या गावांचा संपर्क तुटला आहे.

Web Title: Seven years later, water in Rajapur's main market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.