लोटे औद्योगिक वसाहत विस्तार समस्या संवादातून सुटेल : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 05:15 PM2020-02-01T17:15:54+5:302020-02-01T17:17:05+5:30

सुभाष देसाई म्हणाले की, उद्योग विभागाकडून ज्या मागण्या येतात त्यावर सकारात्मक निर्णय घेतले जातात. तरी औद्योगिक विस्तारात पर्यावरणाचा विचार होईल याची काळजी उद्योजकांनी घ्यावी. औद्योगिक विकास आणि पर्यावरण संवर्धन असणारा मजबूत महाराष्ट्र घडवला जावा अशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भूमिका राहिलेली आहे.

Small industrial settlement extension problem will be resolved through dialogue: Subhash Desai | लोटे औद्योगिक वसाहत विस्तार समस्या संवादातून सुटेल : सुभाष देसाई

लोटे औद्योगिक वसाहत विस्तार समस्या संवादातून सुटेल : सुभाष देसाई

googlenewsNext
ठळक मुद्देयावेळी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग संस्था आणि कुडाळ येथील संशोधक देवधर यांचा कोकण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी : संवादातून सर्व वाद सुटू शकतात याच भूमिकेतून शासन आपली भूमिका बजावेल. आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संवादासाठी पुढाकार घेतल्यावर विस्तारीत लोटे औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सुटेल अशी खात्री राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लोटे (ता. खेड) येथे व्यक्त केले.

खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक संघटनेतर्फे आयोजित कोकण गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पी. अनबलगन, औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन तसेच डॉ. सतीश वाघ आणि सोनजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुभाष देसाई पुढे म्हणाले की, उद्योग विभागाकडून ज्या मागण्या येतात त्यावर सकारात्मक निर्णय घेतले जातात. तरी औद्योगिक विस्तारात पर्यावरणाचा विचार होईल याची काळजी उद्योजकांनी घ्यावी. औद्योगिक विकास आणि पर्यावरण संवर्धन असणारा मजबूत महाराष्ट्र घडवला जावा अशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भूमिका राहिलेली आहे.

सोबतच औद्योगिक सुरक्षेकडे सर्वांना लक्ष द्यावे व योग्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असेल याचीही जबाबदारी उद्योगांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात उद्योगांसमोरील अडचणी दूर करताना लागणाऱ्या परवान्यांची संख्या आम्ही २१पर्यंत आणली आहे. उद्योजक सर्वच बाबतीत उत्तमपणे काम करीत असतील तर याला शून्यापर्यंत नेण्यासही आपण तयार आहोत, असे ते म्हणाले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.

कोकण गौरव पुरस्काराचे वितरण
एन्व्हायरमेंट क्लिअरन्स हा अत्यंत कटकटीचा वेळखाऊ आणि खर्चिक प्रकार आहे. संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला इन्व्हरमेटर क्लिअरन्स घ्यावा. सीईटीपीच्या माध्यमातून ट्रीटमेंट केलेले पाणी दाभोळच्या खाडीत सोडले जाते त्या पाण्याच पाईपलाईन समुद्रापर्यंत न्यावी. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करावे अशा मागण्या उद्योजक संघटनेतर्फे यावेळी करण्यात आल्या. यावेळी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग संस्था आणि कुडाळ येथील संशोधक देवधर यांचा कोकण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Small industrial settlement extension problem will be resolved through dialogue: Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.