रत्नागिरी : प्रशासनासोबत समन्वय ठेवून त्यांच्या मदतीने समस्यांचा निपटारा लवकरात लवकर करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (५ नोव्हेंबर) खंडाळा येथे दिल्या. रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथे जेएसडब्ल्यू, आंग्रे पोर्ट, चौगुले पोर्ट या कंपन्यांसंदर्भातील येथील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीला रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव, गटविकास अधिकारी जाधव, जयगडचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर तसेच जेएसडब्ल्यू पोर्टचे सुदेश मोरे, जेएसडब्ल्यू एनर्जीचे अनिल दाजिच, अँग्री पोटचे सचिन गभाळे, चौगुले पोर्टचेही प्रतिनिधी उपस्थित होते. येथील जनतेने कंपनी संदर्भातील आपली निवेदने पालकमंत्री यांना दिली.यावेळी पालकमंत्री सामंत यांनी या कंपन्यांसंदर्भातील येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी येथील प्रशासनासोबत समन्वय ठेवा. त्यांची मदत घेऊन समस्यांचा निपटारा लवकरात लवकर करा, अशा सूचना संबंधितांना केल्या.
जनतेच्या समस्यांचा प्रशासनाशी समन्वय साधून तात्काळ निपटारा करा : उदय सामंत
By शोभना कांबळे | Published: November 05, 2022 7:00 PM