साखरीत्रिशूळ, चिंद्रावळे गावे ‘रेड झोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:16+5:302021-05-05T04:52:16+5:30
गुहागर : तालुक्यात आजच्या स्थितीत ७७८ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. साखरीत्रिशूळ येथे ३०, तर चिंद्रावळे येथे ३७ रुग्ण असल्याने ...
गुहागर : तालुक्यात आजच्या स्थितीत ७७८ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. साखरीत्रिशूळ येथे ३०, तर चिंद्रावळे येथे ३७ रुग्ण असल्याने ही दोन्ही गावे रेड झोन घोषित करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाकडून या भागात रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी विशेष काळजी घेत असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी देवीदास चरके यांनी दिला.
साखरीत्रिशूळ येथे आठ दिवसांपूर्वी म्हस्करवाडी येथे २२ कोरोना रुग्ण सापडले होते. येथे आरोग्य विभागाकडून तब्बल २५० स्राव घेतल्यानंतर पुन्हा ८ रुग्ण वाढून सद्य:स्थितीत येथे ३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत; तर चिंद्रावळे येथे आधी दोन ठिकाणी १५ व नंतर एकाच वाडीत २२ रुग्ण सापडल्याने येथे ३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. चार दिवसांपूर्वी येथे चिंद्रावळे येथे कोरोना रुग्ण सापडलेल्या वाडीत लग्नसमारंभ होणार होता. याबाबत आरोग्य विभागाने सूचना देऊनही हा समारंभ होणार होता. अशावेळी तहसीलदार गुहागर व पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर तो रद्द करण्यात आला.