रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प समर्थक आणि विरोधक यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुकथनकर समितीत मंगळवारी रत्नागिरीत दाखल झाली आहे. सुकथनकर समितीला होणारा विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे रूप आले आहे.सुकथनकर समिती नाणारबाबत प्रकल्पाशी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली आहे. याठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून या समितीतील सदस्य नाणारवासीय तसेच संबंधितांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. मात्र, प्रकल्प नाणारला असताना तेथील जनतेला म्हणणे मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले जाणे चुकीचे असल्याचे शिवसेनेसह या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या संघटनांनी म्हटले आहे. प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी येणाऱ्या सुकथनकर समितीला रत्नागिरीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाली आहे.शिवसेनेच्या या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या मार्गावरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर विशेष पोलीस पथकही तैनात करण्यात आले आहे.या समितीला भेटण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह कोकण रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम दाखल झाले आहेत. त्याचबरोबर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांबरोबरच प्रकल्प समर्थकही याठिकाणी दाखल झाले आहेत.
रिफायनरी प्रकल्पाबाबत सुकथनकर समिती रत्नागिरीत, जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 1:18 PM
राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प समर्थक आणि विरोधक यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुकथनकर समितीत मंगळवारी रत्नागिरीत दाखल झाली आहे. सुकथनकर समितीला होणारा विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे रूप आले आहे.
ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्पाबाबत सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखलमत जाणून घेणार, कडेकोट पोलीस बंदोबस्त