महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी तानाजी चोरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:45+5:302021-07-20T04:21:45+5:30

चिपळूण : सहकार, साहित्य, शिक्षण, कृषी, क्रीडा आदी विषयांत नियमित सक्रिय वावर असलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, ...

Tanaji Chorge as the Vice President of Maharashtra Sahitya Parishad | महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी तानाजी चोरगे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी तानाजी चोरगे

Next

चिपळूण : सहकार, साहित्य, शिक्षण, कृषी, क्रीडा आदी विषयांत नियमित सक्रिय वावर असलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, कृषिभूषण, लेखक डॉ. तानाजी चोरगे यांची महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. यानिमित्ताने कोकणला पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

कथा, कादंबरी, नाटक, बँकिंग आदी विषयांवरील चाळीसहून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या डॉ. चोरगे यांचे ‘झेप’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांच्या लेखणीतून उतरलेले जीवनानुभव विविधांगी आहेत. उत्तम सामाजिक भान असलेल्या डॉ. चोरगे यांचे सहकार क्षेत्रातील काम आदर्शवत आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीत त्यांच्या भक्कम नेतृत्वाचे मोठे योगदान आहे. शैक्षणिक क्षेत्रात आणि शेतात रमणाऱ्या डॉ. चोरगे यांच्या साहित्यिक कार्याच्या गौरवार्थ गुहागर येथील ज्ञानरश्मी वाचनालयाने आपल्या सभागृहाला ‘डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह’ असे नाव दिले आहे.

दोन वर्षांपूर्वी चिपळूण येथे झालेल्या लेखक, प्रकाशक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरानेही आपले ‘सन्माननीय सदस्यत्व’ त्यांना प्रदान केले आहे. डॉ. चोरगे यांच्यासह ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विद्याधर अनास्कर व दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. प्रथमच परिषदेची ही सभा ऑनलाईन घेण्यात आली. डॉ. चोरगे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने कोकणातील साहित्यिक चळवळीला बळ मिळेल, असा विश्वास साहित्यप्रेमींना आहे.

190721\img-20210719-wa0011.jpg

तानाजी चोरगे

Web Title: Tanaji Chorge as the Vice President of Maharashtra Sahitya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.