सखी मतदान केंद्र ठरले साऱ्यांच्याच आकर्षणाचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:17 AM2019-04-24T00:17:00+5:302019-04-24T00:17:05+5:30
रत्नागिरी : राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे आता मतदानातही महिलांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार ...
रत्नागिरी : राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे आता मतदानातही महिलांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र राखीव ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरीसह इतर पाच विधानसभा मतदार संघात असलेल्या सखी मतदान केंद्रे आकर्षणाचा विषय ठरली. रत्नागिरीतील देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्र सुशोभित करण्यात आले होते. या केंद्रात ५६.३७ टक्के मतदान झाले.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या तीन विधानसभा मतदार संघांचा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या सहा विधानसभा मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या १४ लाख ४० हजार इतकी आहे. त्यापैकी सात लाख ३५ हजार ५९७ महिला मतदार आहेत. तर उर्वरित ७ लाख ६ हजार ३१८ पुरूष मतदार आहेत.
एकूण लोकसंख्येचा विचार करता महिलांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर मतदारांमध्येही महिलांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कुठल्याही निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे मत निर्णायक ठरत असते. महिला मतदारांची संख्या प्रत्यक्ष मतदानावेळी वाढलेली दिसावी, यासाठी ही निवडणूक आयोगाने महिला मतदारांसाठी विविध सुविधा देऊ केल्या आहेत.
याचाच एक भाग म्हणुन महिला मतदारांना आकर्षित करून घ्यावे, या हेतुने प्रत्येक यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले. शहरातील माळनाका भागात असणाºया अ. आ. देसाई हायस्कूल येथे सखी मतदान केंद्र सुरु करण्यात आले होते. या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्षासह सर्व कर्मचारी महिला नेमण्यात आलेल्या होत्या. या केंद्रावर दिव्यांगांच्या मदतीसाठीही महिला स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली होती.
संपूर्ण मतदान केंद्राला गुलाबी आणि पांढºया रंगाच्या फुग्यांची सजावट करण्यात आली
होती.
याठिकाणी मतदानाचा संदेश देणाºया रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मतदारांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी या केंद्रावर मंडप उभारण्यात आले होते. जिल्ह्यातील अशा सहा सखी मतदान केंद्रावर मंडप तसेच इतर केंद्रावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या केंद्रावरील एकूण ८५५ महिला मतदारांपैकी ४८२ मतदारांनी मतदान केले. चिपळूण येथील ओझरवाडी, लांजा, कणकवलीत कलमठ, कुडाळमध्ये कविलकटे आणि सावंतवाडी येथे सखी मतदान केंद्रे ठेवण्यात आली.