रिगलच्या विद्यार्थिनींनी घेतले प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:06+5:302021-04-09T04:33:06+5:30

फोटो कॅप्शन – फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कॉटनकिंगचे जनरल मॅनेजर के. बी. गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देण्यात ...

Training taken by Regal's students | रिगलच्या विद्यार्थिनींनी घेतले प्रशिक्षण

रिगलच्या विद्यार्थिनींनी घेतले प्रशिक्षण

Next

फोटो कॅप्शन – फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कॉटनकिंगचे जनरल मॅनेजर के. बी. गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कोंढे (ता. चिपळूण) येथील रिगल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील फॅशन डिझायनिंग विभागातील डिप्लोमा व्दितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी बारामती, पुणे येथील कॉटनकिंग या कंपनीमध्ये एक महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

प्रशिक्षणादरम्यान या विद्यार्थिनींनी फॅब्रिक विभाग, कॅड डिझायनिंग, कटिंग सेक्शन, जीन्स टी-शर्ट शर्ट प्रॉडक्शन विभाग, वॉशिंग, एम्ब्रॉयडरी, पॅकिंग, फिनिशिंग या विभागांमध्ये काम करून त्याचा अनुभव घेतला. केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रत्यक्ष काम करून मिळणारे शिक्षण हेदेखील महत्त्वाचे आहे. हा या प्रशिक्षणामागील हेतू आहे. कॉटनकिंगचे जनरल मॅनेजर के. बी. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणाचा आम्हांला भावी वाटचालीमध्ये निश्चितच फायदा होईल, असे विद्यार्थिनींनी सांगितले.

Web Title: Training taken by Regal's students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.