आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा संशय - गोवंश हत्याप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 11:52 AM2020-02-03T11:52:11+5:302020-02-03T11:53:57+5:30

त्या दोघांची चौकशी केली असता दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. हे गुन्हे करण्यासाठी त्यांना अन्य तीन साथीदारांनी मदत केल्याचीही कबुली त्यांनी दिली.

Two arrested in Mumbai for killing of cattle | आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा संशय - गोवंश हत्याप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक

आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा संशय - गोवंश हत्याप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक

Next
ठळक मुद्दे - मांस विक्रीतून पैसे कमविण्याचा उद्देश- दिव - दमण, गुजरात येथेही गुन्हे दाखल

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गालगत चिपळूण तालुक्यातील कामथे हरेकरवाडी एस. टी. स्टॉपच्या बाजूला असलेल्या उंबरडोह ढोंडीचा टेप व पिंपळी खुर्द पायरवणे कॅनॉल या दोन्ही ठिकाणी गोवंश हत्येचा प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी मुंबईतील दोघांना चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर रायगड, गुजरात, दिव-दमण, पालघर, पालगड, ठाणे, पुणे या ठिकाणी गुन्हे दाखल असून, गोवंश हत्यामागे आंतरराज्य टोळीचा हात असण्याचा दावा चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी  पत्रकार परिषदेत केला.


याप्रकरणातील संशयित मुंबईत राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिपळुणातील एक पथक मुंबई येथे गेले सात ते आठ दिवस ठाण मांडून होते. त्या ठिकाणी सापळा रचून महंमद शाहीद सुलेमान कुरेशी (३९, रा. फ्लॅट नं.२०२, सीमा रेजन्सी, गोविंदनगर, मिरारोड पूर्व, मूळ रा. जगन्नाथ चाळ, जोगेश्वरी पूर्व, मुंबई) व शहजाद मकसूद चौधरी (३२, रा. रुम नं.४०१, फातिमा बिल्डिंग, नोरेगाव, नालासोपारा पूर्व, जि. पालघर, मूळ रा. दिल्ली) या दोघांनाही दि.२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्या दोघांची चौकशी केली असता दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. हे गुन्हे करण्यासाठी त्यांना अन्य तीन साथीदारांनी मदत केल्याचीही कबुली त्यांनी दिली.
 

गोवंश हत्येचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप नाईक, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, पोलीस नाईक संतोष शिंदे, गगनेश पटेकर, योगेश नार्वेकर, अजित कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रमीज शेख, पोलीस मित्र सचिन चोरगे यांनी तपास करुन आरोपींना पकडले.

पैसा कमावणे हाच उद्देश
हे दोघे मुंबईतून गोल्डन रंगाच्या इनोव्हा कारमधून चिपळूणमध्ये येत होते. चिपळूण परिसरात येऊन मोकाट जनावरे पकडून त्यांची निर्जनस्थळी कत्तल करण्यात येत होती. त्यानंतर त्यांचे मांस गाडीतून मुंबईला नेण्यात येत होते. या मांसाची मुंबई येथे विक्री केली जात होती. मांस विक्री करुन केवळ पैसा कमविणे हाच त्यांचा उद्देश होता.

सीसीटीव्ही फुटेजवरून तपास
चिपळूण पोलिसांनी चिपळूण, गुहागर या ठिकाणी नाकाबंदी केली होती. तसेच महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात येत होते. तर महामार्गावरील प्रत्येक गाड्यांची तपासणी सुरू होती. तसेच रायगड, सातारा, पालघर व इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातून गोपनीय माहिती मिळवण्यात  येत होती. रस्त्यावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर संशयित हे मुंबई येथील राहत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस मुंबईला गेले होते.

Web Title: Two arrested in Mumbai for killing of cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.