महामार्गावर दोन कारची टक्कर, ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 01:41 PM2021-03-31T13:41:52+5:302021-03-31T13:43:40+5:30

Accident Khed Ratnagiri-मुंबई - गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला.

Two cars collide on highway, 5 injured | महामार्गावर दोन कारची टक्कर, ५ जखमी

महामार्गावर दोन कारची टक्कर, ५ जखमी

Next
ठळक मुद्देमहामार्गावर दोन कारची टक्कर, ५ जखमीमुंबई - गोवा महामार्गावर समोरासमोर अपघात

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला.

या अपघातात नॅनो गाडीच्या चालकाला गंभीर दुखापत झाली असून, ब्रिझा कारमधील चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दत्ताराम शिंदे (५७, रा. मुंबई) हे शिमगोत्सवासाठी, ग्रामदेवतेच्या पालखी दर्शनासाठी मुंबई येथून गुहागरला ब्रिझा कारने (एमएच ४७ एसी ३०७३) जात होते. मुंबई - गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक आपेडे फाटा येथे समोरून येणाऱ्या टाटा नॅनो कारशी (एमएच १५ ईपी १४७५) त्यांची समोरासमोर टक्कर झाली.

या अपघातात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर टाटा नॅनो कारचा चालक राहुल पवार याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ खेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. ब्रिझा कारमधील राजेंद्र दत्ताराम शिंदे (५७), निर्मला राजेंद्र शिंदे ( ५३), सायली राजेंद्र शिंदे (१९) आणि ज्योती प्रकाश विचारे (५९) या चौघांना किरकोळ दुखापत झाली. या सर्व जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. खेडचे उपनिरीक्षक इनामदार कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Two cars collide on highway, 5 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.