राजापूर : मानवी वस्तीकडे बिबटे येण्याचे प्रकार वाढत असतानाच राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील कदमवाडीत पडक्या विहिरीत बिबट्याची दोन पिल्ले मृतावस्थेत आढळली आहेत. रविवारी सायंकाळी परिसरात दुर्गंधी पसरल्याने हा प्रकार लक्षात आला.रायपाटण - कदमवाडीतील दत्तात्रय बाळकृष्ण पळसुलेदेसाई यांच्या मालकीची ही विहीर घरापासून काही अंतरावर आहे. विहिरीच्या परिसरात रविवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. या दुर्गंधीनंतर ग्रामस्थांनी शोध घेतला असता विहिरीत मृतावस्थेत बिबट्याची दोन पिल्ले असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ याबाबत वन विभागाला माहिती दिली.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्यांच्या पिल्लांना विहिरीबाहेर काढले. बिबट्याची दोन्ही पिल्ले सहा महिने ते एक वर्षांची असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे
राजापुरात विहिरीत आढळली मृत बिबट्याची दोन पिल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 5:45 PM
leopard, forest department, ratnagirinews मानवी वस्तीकडे बिबटे येण्याचे प्रकार वाढत असतानाच राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील कदमवाडीत पडक्या विहिरीत बिबट्याची दोन पिल्ले मृतावस्थेत आढळली आहेत. रविवारी सायंकाळी परिसरात दुर्गंधी पसरल्याने हा प्रकार लक्षात आला.
ठळक मुद्देराजापुरात विहिरीत आढळली मृत बिबट्याची दोन पिल्ले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढले विहिरीबाहेर