लांजात बसवर आपटून दुचाकीस्वार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 04:00 PM2021-01-28T16:00:31+5:302021-01-28T16:01:29+5:30
Accident Lanja Ratnagiri- भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला वाचविण्यासाठी बस साईटपट्टीवर उतरली तर दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटून बसच्या मागील चाकावर आपटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ३.१५ वाजता दरम्याने व्हेळ मांड कदमवाडी येथे घडली. जखमीला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
लांजा : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला वाचविण्यासाठी बस साईटपट्टीवर उतरली तर दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटून बसच्या मागील चाकावर आपटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ३.१५ वाजता दरम्याने व्हेळ मांड कदमवाडी येथे घडली. जखमीला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
लांजा आगारचालक पी. एस. गार्ढी हे एस. टी. बस (एमएच २०, बीएल ०५४२) लांजा ते झर्ये गाडी घेऊन दुपारी २.१५ वाजता बसस्थानकातून निघाले होते. सायंकाळी ३.१५ वाजण्याच्या दरम्याने व्हेळ मांड कदमवाडी येथे आले असता समोरून भरधाव वेगाने अनिकेत युवराज जंगम (२७, रा. मालगाव, सांगली) हा दुचाकीस्वार विरुद्ध बाजूने येऊन चालकाच्या बाजूच्या मागील चाकाला धडकला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अर्जुना नदीवर धरणाच्या कालव्याच्या कामासाठी तो लांजात आला आहे.
अपघातादरम्यान त्याच्या मागून व्हेळ येथील राजू रामचंद्र शिगम इको गाडी घेऊन येत होते. त्यांनी अनिकेत जंगम याला प्राथमिक उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डोक्याला दुखापत झाल्याने रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, प्रमिला गुरव यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.