परटवणे येथे अनधिकृत बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:28 AM2021-04-05T04:28:24+5:302021-04-05T04:28:24+5:30

रत्नागिरी : शहरातील परटवणे, खालचा फगरवठार येथे नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार फगरवठारवासियांनी केली आहे. हे अतिक्रमण भाजपचे ...

Unauthorized construction at the return | परटवणे येथे अनधिकृत बांधकाम

परटवणे येथे अनधिकृत बांधकाम

Next

रत्नागिरी : शहरातील

परटवणे, खालचा फगरवठार येथे नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार फगरवठारवासियांनी केली आहे. हे अतिक्रमण भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्याचा आराेप नागरिकांनी केला असून, पिढ्यानपिढ्या वापरात असलेली विहीर ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

परटवणे खालचा फगरवठार येथे आमदार प्रसाद लाड यांनी जमीन खरेदी केली आहे. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीची उंची नियमाप्रमाणे ५ फूट हवी ती सुमारे ९ ते ११ फूट बांधण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच संरक्षक भिंत बांधण्यासाठी नगरपरिषदेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचेही म्हटले आहे.

जोपर्यंत जागामालक रस्त्याची जागा व विहिरीचा ताबा नगरपरिषदेला देत नाहीत तोपर्यंत घर बांधकाम व संरक्षक भिंतीचे बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याठिकाणी असणारी विहीर १०० वर्षे जुनी असून, या विहिरीचा सार्वजनिक वापर होत होता. आज ती विहीरही संरक्षक भिंतीच्या आत घेतल्याने नागरिकांची गैरसाेय हाेत आहे. आजुबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ पाणीटंचाईच्या काळात या विहिरीवरून पाणी नेत असून, या विहिरीवर ४०० ते ५०० लोक अवलंबून आहेत. नगरपरिषदेने ही विहीर आरक्षित करून येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, उपनगराध्यक्ष रोशन फाळके, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांना पाठविण्यात आली आहे. यावर नगरपरिषदेने वेळीच कारवाई न केल्यास येथील नागरिक रस्त्यावर उतरून लढा देतील, असा इशाराच खालचा फगरवठार येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Unauthorized construction at the return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.