गणपतीपुळे येथे १५० जादा डोसचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:28+5:302021-07-05T04:20:28+5:30
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे मंदिर कर्मचारी व अधिकारी, परिसरातील दुकाने व्यावसायिक, सुरक्षारक्षक, ब्रह्मवृंद पर्यटक निवास ...
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे मंदिर कर्मचारी व अधिकारी, परिसरातील दुकाने व्यावसायिक, सुरक्षारक्षक, ब्रह्मवृंद पर्यटक निवास गणपतीपुळे कर्मचारी-अधिकारी यांना कोविशिल्ड या लसीचे चे १५० डोस वितरित करण्यात आले
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे डाेस उपलब्ध झाले हाेते. या लसीकरणासाठी पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला हाेता. या वेळी जिल्हा परिषद सदस्य साधना साळवी, पंचायत समिती सदस्य गजानन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी, राजू साळवी, भगवतीनगर सरपंच नूतन मायंगडे, गणपतीपुळे सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार, सदस्य सारिका भिडे, शुभांगी ठावरे, संजय माने, मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. शंतनु वायकर, भगवतीनगर पोलीस पाटील नितीन मायंगडे, पर्यटक निवास गणपतीपुळेचे संजय रामानी, दिलीप भुते, अतुल पाटील, देवस्थान पंच अमित मेहेंदळे, विनायक राऊत, श्रीराम केळकर उपस्थित होते.