खेड : तालुक्यातील वेरळ रेल्वेस्थानकापासून भोस्ते मार्गाच्या डांबरीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही मार्गावर ठिकठिकाणी सातत्याने खड्डे पडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संबंधित ठेकेदाराने ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत या मार्गाचे डांबरीकरण सुरू असतानाच कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र, बांधकाम खात्याने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही
मार्गाची सातत्याने दयनीय अवस्था होत आहे.
दुरुस्तीनंतरही या मार्गावर आतापर्यंत ४ ते ५ वेळा मलमपट्टी करण्यात आली. मात्र, हा रस्ता पुन्हा उखडत असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरतच करावी लागत होती. पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात हे काम करणे अपेक्षित होते. मात्र आता एप्रिलच्या मध्यावर संबंधित ठेकेदाराने मार्गावरील खडे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
..............................
khed-photo 181 खेड तालुक्यातील वेरळ ते भोस्ते या दरम्यानच्या रस्त्यावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यात मलमपट्टी केली आहे.