ओला दुष्काळ जाहीर होण्याची प्रतीक्षा, अवकाळीने शेतकरी कोलमडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:49 PM2019-11-05T13:49:04+5:302019-11-05T13:52:31+5:30

आॅक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले आहे. ज्यावर येथील शेतकऱ्यांची उपजिवीका आहे. त्या भातशेतीची माती झाली आहे.

Waiting for wet drought to be announced | ओला दुष्काळ जाहीर होण्याची प्रतीक्षा, अवकाळीने शेतकरी कोलमडला

देवगड तालुक्यातील वरेरी येथे कापून ठेवलेल्या भात रोपांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देओला दुष्काळ जाहीर होण्याची प्रतीक्षाअवकाळीने शेतकरी कोलमडला

सिंधुदुर्ग : आॅक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले आहे. ज्यावर येथील शेतकऱ्यांची उपजिवीका आहे. त्या भातशेतीची माती झाली आहे.

भातशेतीबरोबरच नाचणी आणि ऊसाच्या शेतीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात न दिल्यास शेतकरी देशोधडीला लागणार आहे.

अतिवृष्टीने काही भागातील कापलेले भात आणि भातरहित गवतगंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. भातशेतीबरोबरच काही ठिकाणी ऊस लागवडही केली जाते. पावसाबरोबर वादळी वाºयाने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातशेतीबरोबरच ऊसाच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

 

Web Title: Waiting for wet drought to be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.