सिंधुदुर्ग : आॅक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले आहे. ज्यावर येथील शेतकऱ्यांची उपजिवीका आहे. त्या भातशेतीची माती झाली आहे.
भातशेतीबरोबरच नाचणी आणि ऊसाच्या शेतीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात न दिल्यास शेतकरी देशोधडीला लागणार आहे.अतिवृष्टीने काही भागातील कापलेले भात आणि भातरहित गवतगंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. भातशेतीबरोबरच काही ठिकाणी ऊस लागवडही केली जाते. पावसाबरोबर वादळी वाºयाने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातशेतीबरोबरच ऊसाच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.